Breaking

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

विदयापीठामध्ये हिंदी - मराठी साहित्यातील परस्पर अनुवादाचे कार्य अत्यंत महत्वाचे - कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के

 

कुलगुरू,डॉ.डी.टी.शिर्के


*प्रा.अक्षय माने :कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


शोधनकार्य हे समाजोन्मुख व सृजनात्मक असावे -  समकालीन हिंदी लेखक भगवानदास मोरवाल

भगवानदास मोरवाल


कोल्हापूर, दि.17 सप्टेंबर - शिवाजी विदयापीठातील हिंदी विभागामध्ये 23 ऑगस्ट 2021 ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पीएच.डी कोर्सवर्क सुरु होता. 14 सप्टेंबर या राष्ट्रीय हिंदी दिवसाच्या निमित्ताने या कोर्सवर्कचा समापन कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. 

       यावेळी कार्यक्रमाचे बीजभाषक, सुप्रसिध्द हिंदी लेखक भगवानदास मोरवाल बोलत होते. पीएच.डीचे संशोधनकार्य करताना विदयार्थ्यांनी समाजोन्मुख दष्टिकोन  लेखनशैली जोपासावी'' असा संदेश त्यांनी दिला. लेखक मोरवाल यांच्या श्काला पहाडश्, श्वंचनाश्, श्शंकुतिकाश् या कांदब-या तसेच काही कथा संग्रह हिंदी विभागाच्या एम.ए भाग-1 च्या अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयापीठाचे कुलग़ु़रु डॉ.डी.टी.शिर्के होते. त्यांनी मराठी व हिंदी साहित्यांचा परस्पर अनुवाद व्हायला हवा तसा प्रस्ताव ही विदयापीठ प्रशासनाकडे देण्याचे सुचविले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपकुलगुरु डॉ.पी.एस.पाटील यांनीही हिंदी भाषेविषयी आपले विचार मांडले.

       कार्यक्रमाचे संयोजक,हिंंदी विभागप्रमुख डॉ.ए.एम.सरवदे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालक डॉ.चंदा सोनकर यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभारप्रदर्शन श्री विजय सदामते यांनी केले. या कार्यक्रमास जवळपास 80 हिंदी व इतर भाषाप्रेमींनी आपली ऑनेलाईन हजेरी लावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा