Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

जयसिंगपूरच्या समाजवादी प्रबोधिनी तर्फे कालवश शांताराम बापू गरुड यांना अभिवादन




मालोजीराव माने  :  कार्यकारी संपादक

जयसिंगपूर : समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर व शिरोळ तालुका पुरोगामी संघटनेच्या वतीने कालवश आचार्य शांताराम बापू गरुड यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 

     सुरुवातीस प्रबोधनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक शिरगुप्पे,प्रा.ए.एस. पाटील,डॉ.चिदानंद आवळेकर व  प्राचार्य वाय.एम.चव्हाण व इतर कार्यकर्त्यांच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार घालून स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.

      समाजवादी प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक शिरगुप्पे म्हणाले की, जयसिंगपूर शाखेची सुरुवात बापूंनी करून समतावादी समाजधारा आणण्याचे काम त्यांनी केलं.प्रा. ए.एस. पाटील म्हणाले, असंख्य पक्षांची वैचारिक व पुरोगामी बैठक निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्र सेवा दल संघटक बाबासाहेब नदाफ यांनी सेवा दलासाठी बापूनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ.यशवंत चव्हाण यांनी शांताराम गरुड यांचे समाजातील वंचित घटकासाठी केलेल्या कामाची चर्चा करून बापूंनी विचारांची नाळ कॉलेजशी जोडून वैचारिक शिदोरी देण्याचं काम कसे करीत होते याविषयी आठवणी सांगितल्या. कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांनी बापूंच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी अभ्यास शिबिराच्या माध्यमातून केलेले कार्य  व दिलेली स्फूर्तीची आठवण करून दिली. शाहीर रफिक पटेल यांनी विविध चळवळींना वैचारिक बैठक व दिशा देण्याचे काम केले या विषयी त्यांनी भाष्य केले. बापूंनी युवकांना चळवळीत येण्यासाठी दिलेले योगदान व प्रयत्न यांना उजाळा देण्याचे कामाबाबत डॉ.प्रभाकर माने यांनी आठवणी सांगितल्या.संविधानाला स्मरून चळवळीतील प्रत्येक घटकांनी काम करीत राहणे  याविषयी विचार भीमराव तांबे यांनी मांडले. 

     डॉ. चिदानंद आवळेकर यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये बापूंचा योगदान कसे होते याचे अनुभव कथन करीत सरतेशेवटी ते म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा कार्य करीत राहणे हेच बापूंच्या स्मृतीला अभिवादन ठरू शकतं.  

    या कार्यक्रमाचे आभार डॉ.सुनिल बनसोडे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.प्रभाकर माने यांनी केले. सदर कार्यक्रमास डॉ.तुषार घाटगे, खंडेराव हेरवाडे,Adv. संभाजी जाधव हे मान्यवर व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा