*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
नेज ता.हातकणंगले ( कोल्हापूर) येथील कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रह साठी दिले जाणारे 'श्रीशब्द ' काव्य पुरस्कार नुकतेच स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पोतदार यांनी जाहीर केले.
गेली काही वर्षे थांबलेली ही साहित्य पुरस्कार चळवळ पुन्हा कार्यरत राहणार असून गेल्या तीन वर्षाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.मात्र यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार समारंभ रद्द करणेत आला असून विजेत्याना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र पोहोच करणेत येईल.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे:
सन : २०१८
१.तलखली: माया पंडित,कोल्हापूर
२.माझ्यातला कवी मरत चाललाय:इरफान शेख,गजबार्ड चंद्रपूर
सन : २०१९
१.माझ्या हयातीचा दाखला : विशाल इंगोले:लोणार सरोवर
२.शेनाला गेलेल्या पोरी: चंद्रशेखर कांबळे,राधानगरी
सन : २०२०
१.या परावलंबी दिवसात:बालाजी मदन इंगळे,जळगाव
२.कैवार:शिवाजीराव शिंदे,सोलापूर
विशेष पुरस्कार : सन्मानपत्र
१:सईच्या कविता:संदीप काळे,पाथर्डी
२.मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं:हबीब भंडारे, औरंगाबाद
अशी पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.चंद्रकांत पोतदार,पदाधिकारी व समितीच्या सर्व सदस्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिंनदन केले आहे. तसेच कवी सुभाष पाटील यांच्या अध्क्षतेखालील समितीने हे पुरस्कार निवडले गेले आहेत अशा प्रकारची माहिती नेजच्या 'स्फूर्ती साहित्य संघाने' जय हिंद डिजिटल न्यूज माध्यमाला दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा