Breaking

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

दोन चेन स्नॅचिंग गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश व ₹ ४,४०,७००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

            स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर


प्रविणकुमार माने : उपसंपादक


 कोल्हापूर : मा.पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे यांनी मालाविरूध्दचे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता तसेच घडले गुन्हे उघडकीस आणणे करीता सक्त पेट्रोलिंग करून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

      मा.पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रमोद जाधव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथके तयार केली. त्यापैकी सहा पोलीस निरीक्षक, किरण भोसले यांचे पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. की, रविराज पाटील व वैभव पाटील दोघे रा. केनवडे, ता. कागल यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असून ते जबरदस्तीने चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार आहेत. 

    त्यानुसार आज रोजी स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एमएच-०९ ईएफ-४२५४ वरून लोणार वसाहत येथील मुस्लीम कब्रस्तान समोरील गेटजवळ येणार आहेत अशी माहिती मिळाली. मिळाले माहितीचे अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, असिफ कलायगार, विनोद कांबळे व रणजीत पाटील यांनी लोणार वसाहत येथील मुस्लीम कब्रस्तान समोरील गेटचे आसपास सापळा लावून रविराज दिलीप पाटील, व.व. २१ व वैभव किसन पाटील, व.व. २१ दोघे रा. केणवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर यांना पकडून त्यांचे कब्जातील मोटर सायकलसह सुमारे ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये ०१ बोरमाळ,०२ घंटण व १ मंगळसुत्र असा एकूण ₹ ४,४०,७००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

     नमुद आरोपींकडून कागल, मुरगूड पोलीस ठाणे व निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे कडील प्रत्येकी ०१ असे एकूण ०३ जबरी चोरीचे (चेन स्नॅचिंगचे) गुन्हे उघडकीस आले आहेत.

       सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक,मा.शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक, मा.तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रमोद जाधव, सहा.पोलीस निरीक्षक, किरण भोसले, शिवानंद कुंभार तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, असिफ कलायगार, विनोद कांबळे, रणजीत पाटील व अनिल जाधव, रफिक आवळकर यांनी केली आहे.

       स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा