Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

शिरोळ पोलीस ठाणेची जबरदस्त धाड : जांभळी येथील छाप्यात ₹ ५४,३००/- किमतीची देशी दारू जप्त

 

शिरोळ पोलीस ठाणे

प्रविणकुमार माने : उपसंपादक


        मौजे जांभळी या गावी शिरोळ पोलिसांनी प्रो.रेड करून  पहिला आरोपी बाळासाहेब शामराव चव्हाण  व दुसरा आरोपी  दत्तात्रय शामराव चव्हाण यांच्या कब्जातील एकूण किंमत रु. ५४,३००/-ची देशी दारू जप्त करण्यात आली.

     आज रोजी पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे जांभळी या गावी आरोपी बाळासाहेब शामराव चव्हाण याचे  कब्जात त्याचे घरी देशी दारूचे साडेनऊ बॉक्स एकूण किंमत रु. २८,३८०/-   तसेच दुसरा आरोपी दत्तात्रय शामराव चव्हाण दोघे रा. माळभाग जांभळी याचे कब्जात देशी दारूचे 9 बॉक्स किंमत रु.  २५,९२०/-  असा एकूण किंमत रु. ५४,३००/-  देशी दारूचा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या इराद्याने, कब्जात बाळगलेला मुद्देमाल छापा टाकून हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

     शिरोळ पोलीस ठाणेच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा