जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर महाविद्यालयास २७ व २८ ऑक्टोंबर,२०२१ रोजी बेंगलोरच्या'नॅक पियर टीमची' तिसऱ्या टप्प्यासाठी(Third Cycle) असेसमेंट व अक्रिडीटेशन कामी भेट दिली व या टीम कडून कॉलेजच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
बुधवार दि.२७ ऑक्टोबर,२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता या बेंगलोरस्थित संस्थेच्या एक्सपर्ट टीमने भेट दिली. सुरुवातीस या टीमचे एनसीसी(NCC) विभागाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यानंतर कॉलेजचे प्राचार्य,डॉ.सुरत मांजरे व डॉ. संदीप साबळे यांनी सदर टीमचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या सन २०१५-१६ ते २०१९-२०२० या ५ वर्षातील प्रगती व विकासाबाबत उत्तम सादरीकरण केले. कॉलेज IQAC समन्वयक डॉ. संदीप साबळे यांनी नॅक पियर टीमसमोर सादरीकरण व सांगोपांग चर्चा केली. यानंतर नियोजनाप्रमाणे कॉलेजच्या सर्व विभाग प्रमुखासह संवाद बैठक आयोजित करून विभाग प्रमुखांना वैयक्तिक माहिती व विभागनिहाय माहितीची विचारणा करण्यात आली.
मध्यानह भोजना दरम्यान संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे व पद्माकर पाटील यांनी नॅक पियर टीमसमोर कॉलेज विकासाचा आराखडा सविस्तरपणे मांडला. दुपारनंतर आजी- माजी विद्यार्थी व पालकांसोबत संवाद बैठक आयोजित करून त्यांच्याशी महाविद्यालयीन भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी केंद्रित बाबीबाबत या घटकांकडून माहिती घेतली व आनंददायी संवाद बैठक पूर्ण झाली. यानंतर सदर टीमने महाविद्यालयात असलेल्या बायोडाव्हरसिटी म्युझियम व बायोइन्फर्मेशन सेंटर, बोटॅनिकल गार्डन,बटरफ्लाय गार्डन व अन्य भौतिक सोयी सुविधाना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. यानंतर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाकडून ३५ मिनिटांचा महाराष्ट्र कला दर्शन घडविणाऱ्या कलेचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. या कलाविष्कार बाबत प्रत्यक्ष कलाकारांना भेटून त्यांनी कलाकारांचे कौतुक केले.
दुसऱ्या दिवशी, २८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राचार्य, समन्वयक व सहसमन्वयक यांच्याशी संवाद साधला व त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयास भेट देऊन कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली. व लगेचच महाविद्यालयातील इतर उर्वरित भौतिक सुविधाना भेटी देण्यात आल्या. यानंतर त्यांनी अहवाल लेखनाला सुरुवात केली व सरतेशेवटी एक्झिट बैठकीमध्ये प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी यांच्याशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधताना महाविद्यालयाच्या गुणवत्तेबाबत समाधानाचे संकेत दिले. शेवटी अप्रत्यक्ष अभिप्राय देताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याच्या शैक्षणिक प्रगती व करिअर उत्कर्षासाठी महाविद्यालयाने कटिबद्ध राहिले पाहिजे असा सूतोवाच दिला.
या दोन दिवशीय बेंगलोरच्या'नॅक पियर टीमच्या भेटीदरम्यान संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, IQAC समन्वयक डॉ.संदीप साबळे व सहसमन्वयक डॉ.पी.पी.चिकोडे व सर्व क्रायटेरिया प्रमुख, विभाग प्रमुख, विविध कमिटीचे समन्वयक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी खूप परिश्रम घेतले.
अभिनंदन सर्व टीमचे
उत्तर द्याहटवाखूप छान 👌, नॅक कमिटी भेटीचा सर्व वृत्तांत अचूक शब्दात छान लिहिला, सर्व कमिटी सदस्य आणि सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
उत्तर द्याहटवा