डॉ.नंदकुमार कुंभार |
पीएच.डी. मार्गदर्शक ,प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील |
रमेशकुमार मिठारे : विशेष प्रतिनिधी
निमशिरगाव , ता. शिरोळ येथील नंदकुमार विरभद्र कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी जाहीर झाली. नाईट काॅलेज कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. " स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी तील कृषीजन समूहाची भाषा " या विषयावरील प्रबंध त्यांनी प्रा. डॉ. जी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाकडे सादर केला होता. या अभ्यासासाठी त्यांना ज्येष्ठ लेखक राजन गवस, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, सौ. रजनीताई मगदूम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. त्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात झाली आणि उच्चशिक्षित व काम करण्याची धडपड यामुळे सलग दोन वेळा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले. उत्तम वक्तृत्व व कार्य करण्याची क्षमता तसेच कुशल संघटन कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक संपादन करत आहेत. त्यांच्यावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचा प्रचंड पगडा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.
प्रा. डॉ.गोमटेश्वर पाटील यांची सामाजिक बांधिलकी |
प्रा. नंदकुमार कुंभार हे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे माजी गुणवंत विद्यार्थी असून विद्यार्थिदशेत ही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या शैक्षणिक उच्चकोटीच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तसेच पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. गोमटेश्वर पाटील हे जयसिंगपूर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा