Breaking

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

*डॉ.खंडेराव शिंदे रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्यावतीने आऊट स्टॅंडिंग टीचर्स अॕवार्डने सन्मानित*


डॉ.खंडेराव शिंदे खासदार धैर्यशील माने यांच्या कडून पुरस्कार स्वीकारताना


प्रा.अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


     रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. खंडेराव शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण केलेल्या कार्याची दखल घेऊन आऊट स्टॅंडिंग टीचर्स अॕवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.  ॲवार्ड प्रदान कार्यक्रम खासदार श्री. धैर्यशील माने आणि आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांच्या हस्ते संपन्न झाला.  

       डाॕ. शिंदे यांना या पूर्वी त्यांच्या कोल्हापूर राज्याचा इतिहास ( सन १८३८ ते सन १८९४ ) या ग्रंथास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या *डॉ.खंडेराव शिंदे रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्यावतीने आऊट स्टॅंडिंग टीचर्स अॕवार्डने सन्मानित* हुतात्मा छत्रपती चौथे  शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार देवुन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.  या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य रो.डाॕ. प्रशांतकुमार कांबळे, रो.नागनाथ बसुदे, रो.यतिराज भंडारी, रो.राजु तारदाळे, रो.डाॕ.हिंदूराव संकपाळ, रो.प्रशांत गुरव,रो. अभिजित पाटील, रो.सचिन पाटील, रो.सचिन चौगुले, रो.अशोक ढवळे, रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महाविद्यालतील सर्व  शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी  यांनी त्यांचे अभिनंदन केले.

      त्यांना बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार डॉ. निवेदिता माने सचिव खासदार धैर्यशील माने यांचे प्रोत्साहन  मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा