Breaking

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

*पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि जिना पाटील यांच्या दातृत्वाने आई वृध्दाश्रमास सोलर मिळाला


सोलर सिस्टमचे पूजन

गीता माने : सहसंपादक


  जयसिंगपूर : गेली अनेक वर्षांपासून आई वृध्दाश्रमातील वृध्दांना आंघोळीसाठी गरम पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. इलेक्ट्रॉनिक गिझर मुळे येणाऱ्या भरमसाठ लाईटबीलामुळे गरम पाण्याचा प्रश्न प्रलंबितच होता. पण जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि सागर सेल्स ॲड सर्व्हिसेसचे मालक जीना पाटील यांच्या दातृत्वाने आई वृध्दाश्रमास ३०० लिटरचा सोलर सेट मिळाला.

              पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के हे आई वृध्दाश्रमातील अनाथ , निराधार वृध्दांचे नाथ आणि आश्रयदाते बनून वेळोवेळी मदतीचा हात देत असतात. यांच्या मदतीच्या बातम्या  आणि यांच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन सागर सेल्स ॲड सर्व्हिसेसचे मालक जीना पाटील यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना सोलर देणगी स्वरुपात देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मस्के यांनी आई वृध्दाश्रमास गरम पाण्याची गरज असल्याने त्यांना सोलर द्यावे अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन जीना पाटील यांनी लगेचच आई वृध्दाश्रमास ३०० लिटरचा सोलर देण्याची घोषणा केली व लगेचच नवीन सोलर देणगी स्वरुपात दिला. पण सोलर जोडण्यासाठी प्लंबर भरमसाठ मजुरी मागत असल्याने व वृध्दाश्रमास हा खर्च परवडणारा नसल्याने जीना पाटील यांनी स्वखर्चाने प्लंबर सुध्दा देऊन सोलर बसवून घेतला. 

              आज सकाळी ११ वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सागर सेल्स ॲड सर्व्हिसेसचे मालक जीना पाटील आणि दैनिक पुढारीचे पत्रकार संतोष बामणे यांच्या हस्ते सोलरचे पुजन आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.  

          यावेळी आई वृध्दाश्रमातील वृध्दांनी या मदतीबद्दल पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि जिना पाटील यांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी ही मदत आमच्या साठी लाख मोलाची असुन अनाथ, निराधार वृध्दांच्या दु:खावर फुंकर घालणारी आहे. आई वृध्दाश्रम त्यांचे उपकार कधीही विसरू शकणार नसुन कायम त्यांचे ऋणी राहील अशी मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

         यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - प्रा. गंगाराम सातपुते , पत्रकार - राहुल पोवार ,  तानाजी सोनुले , ‌विजय पाटील , पोलिस काॅन्टेबल अमोल अवघडे आणि सागर सुर्यवंशी उपस्थित होते.

         मा.जीना पाटील यांच्या संवेदनशील दातृत्वामुळे आई वृद्धाश्रमास मोठी मदत झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा