Breaking

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

माहिती अधिकाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक : अॕड.कल्याणी खांडेकर

 

अॕड. कल्याणी खांडेकर


प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी


     रूकडी  येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने माहिती अधिकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले प्रमुख वक्त्या म्हणून कोल्हापूर येथील अॕड. कल्याणी खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. 

   या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.अमर बुल्ले यांनी केले. माहिती अधिकार याविषयी भाष्य करताना अॕड.कल्याणी खांडेकर म्हणाल्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बरोबर अनेक देशात माहितीचा अधिकार मिळविण्यासाठी आंदोलने झाली आहेत,  देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला मते मांडण्याचा अधिकार आहे, आपणाला मतदान करुन प्रतिनिधी निवडून देण्याचा जसा अधिकार आहे तसाच निवडून दिलेले प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये काय काम करतात याची माहिती घेण्याचाही अधिकार आहे. गुप्तता राखण्याबाबतची  माहिती आपणाला मागविता येत नाही याचीही  जाणीव आपणाला असली पाहिजे. माहिती अधिकाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे असे मत ॲड.खांडेकर यांनी व्यक्त्त केले. यावेळी अॕड. खांडेकर यांनी  माहिती अधिकाराबाबत सविस्तर माहिती दिली, 

     अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश मोरे म्हणाले,भारताच्या संविधानामुळे माहितीचा अधिकार आपणाला प्राप्त झालेला आहे. आपल्यावर अन्याय होतो किंवा नाही याचे ज्ञान अनेक लोकांना नाही. यासाठी  आपल्या देशातील कायदे आपण समजावून घेतले पाहिजेत.  माहिती अधिकाराखाली माहिती मागविताना  काही वेळेस त्या माहितीची आवश्यकता नसताना माहिती मागविली जाते त्यामुळे संबंधितांना विनाकारण वेळ खर्च करावा लागतो. याची जाणीव असणे आवश्यक आहे. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानास महाविद्यालयाचे प्र- प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे,सर्व शिक्षक प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माहितीपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.अशोक पाटील यांनी केले.

    सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती अधिकार या विषयी उत्तम माहिती प्राप्त झाली. सहभागी घटकाकडून या कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा