Breaking

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

कोल्हापूरातील एकाच कुटुंबातील तिघांचा हल्याळ येथे अपघातात मृत्यू*

 

कोल्हापूरचे तिघे जण अपघातात ठार


हेमंत कांबळे :  कोल्हापूर शहर प्रतिनिधी


    हल्याळ (जि. कारवार) येथे नातेवाईकांकडे श्राद्ध कार्यासाठी जाणाऱ्या कोल्हापूर, रामानंद नगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी  घडली. घटनेची नोंद हल्ल्याळ पोलीस स्थानकात झाली आहे. मीना गणेश पिल्लई (वय ५५), सरस्वती पिल्लई (३५) आणि राजमा पिल्लई (सर्व रा. रामानंद नगर, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर राधाकृष्ण पिल्लई (४०) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर हुबळी येथील केएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा