*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
*जयसिंगपूतील झोपडपट्टी धारकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक घेतली यसिंगपूर झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार -राज्यमंत्री यड्रावकर
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टी नियमतीकरणाचा प्रश्न राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निर्देशानुसार कायमस्वरूपी निकाली निघणार आहे, याबाबत जयसिंगपूर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील या मुख्य प्रश्नांसह विविध प्रश्नांसंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टी धारकांची नियमतीकरणाची अनेक वर्षाची मागणी आणि झोपडपट्टी धारकांच्या समस्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि झोपडपट्टी धारकांचा हा प्रश्न तातडीने सोडवला जावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी व अनेक मान्यवर नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते,
चर्चेत सहभाग घेताना उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी झोपडपट्टीधारकांच्या या प्रश्नाचे गांभीर्य आणि त्यांच्या समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या आणि झोपडपट्टीधारकांना न्याय मिळावा अशी आग्रही मागणी केली,
संपूर्ण बैठकीत सकारात्मक चर्चा होताना राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिलेल्या निर्देशानंतर झोपडपट्टी नियमतीकरण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली शहरातील झोपडपट्टी नियमितीकरण करताना शासकीय जागेवरील 2011 पूर्वीची अतिक्रमणे त्याचबरोबर अतिक्रमित शासकीय जागा लवकरच जयसिंगपूर नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले, झोपडपट्टी धारकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील चर्चेनंतर शाहूनगर बेघर वसाहत मधील मिळकत धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणेकरिता मिळकतीच्या अंतविभाजनास मंजुरी देण्यात येईल, अंत विभाजनानंतर शाहूनगर बेघर वसाहत मिळकतधारकांना इंदिरा आवास योजनेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर यातील वाटप करून शिल्लक राहिलेल्या उर्वरित रिकाम्या भूखंडांवर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्याबाबतचे नगर परिषदेकडे प्राप्त होणारे प्रस्ताव जयसिंगपूर नगरपरिषदेने तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावेत अशा सूचना देखील राज्यमंत्री यड्रावकर यांनी बैठकीत दिल्या राज्यमंत्री यांनी निर्देशित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना आश्वासित केले, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे जयसिंगपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीच्या जागेचा प्रश्न सुद्धा बऱ्याच वर्षानंतर मार्गी लागला आहे, केवळ राज्यमंत्री यड्रावकर यांच्यामुळेच जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न निकाली निघणार असल्याने नागरिकांच्या मधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या प्रसंगी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, नगरपरिषद विभाग जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख हेमंत निकम,भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती माळवदे, नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, शितल गतारे, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, दादासाहेब पाटील चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, राजेंद्र आडके, राजेंद्र झेले यांच्यासह मान्यवर आणि जयसिंगपूर नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा