लसीकरणासाठी आवाहन, अकिवाट |
आदिनाथ पाटील : अकिवाट प्रतिनिधी
प्रशासनातर्फे आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करून दिली जात आहे. सर्वत्र लसीकरण युद्धपातळीवर चालू असतानाच शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे आरोग्य सेवा उपकेंद्रात महालसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 8 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यत हे शिबीर अकिवाट उपकेंद्रात शिबिर पार पडले.
उपकेंद्रातील डॉक्टर आणि आशा सेविका लसीकरणासाठी तत्पर आहेत, त्यामुळे महालसीकरणाच्या पार्श्वभूमीवर CHO पूजा तिवडे, आरोग्य सहायक N.M. झारी, आरोग्य सेवक संदीप हालुंडे तसेच सर्व आशा सेविकांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा लाभ घेण्याच आवाहन केलं होतं आणि त्याला नागरिकांतून योग्य तो प्रतिसाद मिळाला आणि एका दिवसात आकडा 300 पार गेला.
आता महालासीकरणा अंतर्गतच 9 रोजी गावातील राहिलेल्या नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्यात येणार असल्याची बातमी CHO पूजा तिवडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा