डावीकडून अजिंक्य ,महादगोंडा पाटील व पृथ्वीराज |
गीता माने : सहसंपादक
सैनिक टाकळी येथील रिक्षाचालक प्रदीप कोळी यांचा 3 वर्षाचा मुलगा पृथ्वीराज याला डोळ्याच्या कॅन्सरने घेरलय. पण गरीब परिस्थिती असलेल्या प्रदीप यांना डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी 5 लाख खर्च सांगितल्यामुळे प्रदीप यांना आपल्या मुलाचे डोळे वाचवण्यासाठी मदतीची गरज आहे अशा प्रकारच्या मदतीचे आवाहन करणारी बातमी राजापूर येथील पाटील यांनी जय हिंद डिजिटल न्यूजवर वाचली होती. पृथ्वीराज या बालकाला इलाजासाठी काहीतरी मदत व्हावी या उदात्त भावनेने महादगोंडा पाटील यांनी काही निवडक मित्रांना सोबतीला घेऊन राजापूर येथे आर्थिक मदत संकलित करण्यासाठी मदतफेरीचा बेत आखला.
त्याच वेळी त्यांच्या पत्नी सौ. पाटील यांनी कोणाला मदत? कशासाठी? याबाबत श्री पाटील यांना विचारत होत्या. श्री पाटील यांनी सर्व माहिती आपल्या पत्नीला देत असताना त्याचवेळी त्यांचा ६ वर्षाचा मुलगा अजिंक्य पाटील याने हे सर्व माहिती ऐकली आणि वर्षभर सायकल खरेदी करण्यासाठी गोळा केलेली भिशीतील सर्व पैसे पृथ्वीराजचा डोळा ठीक होण्यासाठी मी देणार असल्याबाबत तो बोलला. त्यावेळी पाटील यांनी आपल्या मुलग्याची पृथ्वीराजच्या दुःखा विषयीची संवेदनशीलता पाहून त्यांचे डोळे गहिवरले त्याला विरोध न करता अजिंक्यला थेट पृथ्वीराज कोळी या मुलगाच्या घरी घेऊन गेले. त्याची विचारपूस करून अजिंक्यने भिशीतील सर्व पैसे त्याला देऊ केले. पृथ्वीराजच्या इलाजाच्या खर्चातील अजिंक्यचा वाटा हा खारीचा असला तरी त्या बालकाच्या भावना खूप महत्त्वाचे आहेत. कारण एका बालकाचं दुसऱ्या बालकाविषयी असलेलं परोपकारी वृत्तीचा आदर्श आजच्या स्वार्थी व असंवेदनशील लोकांनी घेण्यासारखे आहे.
खरंच इतकी संवेदनशीलता या लहान बालकाकडे कशी आली ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. या बालकाच्या दयाभाव वृत्तीला जय हिंद डिजिटल न्यूज परिवाराकडून सलाम
सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की, पृथ्वीराज कोळी या तीन वर्षाच्या बालकाच्या दादा पोटी आपल्याकडून आर्थिक मदत व्हावी ही अपेक्षा ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा