Breaking

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

*स्व.आ.डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर ; महादेव माने यांच्या 'भगदाड' या कथेला प्रथम क्रमांक


 मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


 शिरोळ- स्व.आ.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून खंडोबाचीवाडी (भिलवडी) जि. सांगली येथील श्री. महादेव तुकाराम माने यांच्या 'भगदाड' या कथेला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे अशी माहिती मासिक इंद्रधनुष्यचे संपादक गणपतराव (दादा) पाटील यांनी दिली.मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली अंकाच्या संयुक्त विद्यमाने या राज्य पातळीवरील कथास्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्पर्धेचे हे ६वे वर्ष असून यात महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील ७८ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

      दुसरा क्रमांक केनवडे ता. कागल येथील संतराम नाना पाटील यांच्या "तिढा' या कवेला प्राप्त झाला आहे. तर तिसरा क्रमांक त्रिंबक (मालवण) येथील एकनाथ गायकवाड यांच्या आपत्ती निवारण' व नांदेड येथाल स्वाती कान्हेगांवकर यांच्या समर्पण" या कथांना विभागून देण्यात आला आहे. या शिवाय उत्तेजनार्थ पारिताषिक १) पाडळी खुर्द ता. करवीर येथील सौ. वैशाली सरदार पाटील यांची कथा भरमाचा भोपळा २) इचलकरंजी येथील महावीर कांबळे यांची कथा मोर्चा' व कोयनानगर येथाल सौ. सविता चंद्रकांत पोतदार यांची कथा आई व्हावी मुलगी माझी यांना प्राप्त झाले आहे अशी माहिती गणपतराव पाटील यांनी दिली.           

      पारितोषिक वितरण स्व.डॉ.सा. रे. पाटील यांच्या जयंती दिनी ११ डिसेंबर २०२१ रोजी होणार असल्याचे साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार यांनी सांगितले. या वेळी इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील, संजय सुतार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा