बापाने स्वतःच्या मुलाला फेकून दिले नदीत |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने निर्दयी पित्याने मुलाला नदीत फेकले. (कबनुर ता. हातकणंगले) येथील निर्दयी पित्याने हे कृत्य केले.
त्याने आपल्या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने या कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे. पित्याने मुलाला नदीत फेकले या वार्तेने परिसरात खळबळ उडाली आहे.अफांन सिकंदर मुल्ला( वय 5 रा पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे त्या मुलाचे नाव आहे, तर पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) यास शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा