शाहूनगरस्थित सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिर |
विक्रांत माळी : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे बंद होती मात्र ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून सर्व मंदिरे खुले करण्यास परवानगी दिली आणि भक्तगणांच्यात एकच जल्लोष निर्माण झाला. जयसिंगपूर शहरातही सर्व मंदिरे उघडली गेली.
याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूरातील सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिर उघडण्यात आले. खरं म्हणजे जयसिंगपूर शहरातील शाहूनगरस्थित श्री महालक्ष्मी मंदिर व श्री कळका माता मंदिर हे जयसिंगपूर वासियाचे श्रद्धास्थान आहे. शाहूनगर निवासनी श्री महालक्ष्मी मंदिर गेली 50 वर्षापासून नवरात्रोत्सवात देवीचा जागर मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा होत असतो.
मंदिराबाहेरील विविध दृश्य |
या मंदिराची स्थापना व उभारणी गुरुवर्य बाबुराव बंडू माळी ( माजी उपनगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद ) यांनी केली. यावर्षी दि. 7/10/2021 ते 16/10/2021रोजी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.या दिवशी वेगवेगळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते तसेच या 10 दिवसामध्ये संपूर्ण जयसिंगपूर व आजूबाजूच्या गावा मधील भक्ताचे अलोट गर्दी असते. मंदिरामध्ये दांडिया, गरबा, भजन व कीर्तन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो. भक्तांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
जयसिंगपूर व परिसरातील सर्व भक्तगणांचे अटल श्रद्धास्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.या महालक्ष्मी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बाबुराव बंडू माळी तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री प्रकाश बाबुराव माळी हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा