डॉ.पांडुरंग खटावकर,PHC जयसिंगपूर |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
"जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न "
जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने "माझे आरोग्य माझी जबाबदारी" या विषयांतर्गत व्याख्यान व पल्स पोलिओ लसीकरण,२०२१ प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे व प्र.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
जयसिंगपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मदत करण्यासाठी जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पल्स पोलिओ मोहीम ३१ जानेवारी,२०२१ रोजी तसेच राष्ट्रीय विशेष लसीकरण मोहिमेच्या वेळेस राष्ट्रीय सेवाभावी योगदान दिले होते.
सुरुवातीस विक्रांत माळी व रुचिता कोठावळे यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी उपस्थित मान्यवर व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा स्वागत करून प्रास्ताविकात ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही सेवाभावी वृत्तीने व सामाजिक भान जपत सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे या व्याख्यानाच्या माध्यमातून समस्त स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे व त्याचा प्रचार आणि प्रसार या विद्यार्थिनी करावा. तसेच विद्यार्थ्यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी प्रमाणपत्र वितरण आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ.पांडुरंग खटावकर यांचा परिचय करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या मध्ये डॉ. खटावकरच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविले.
माझे आरोग्य व माझी जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. खटावकरानी कोरोना लसीकरणा संदर्भातील असणारे भ्रम , लसीकरणाचा फायदा,कोरोनाविषयी जनजागृती करावयाच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजने्तील विद्यार्थ्यांना केल्या.सरते शेवटी म्हणाले,देशाच्या विकासात्मक बांधणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान रचनात्मक आहे. तसेच भविष्यामध्ये कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जायचं असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेचे शिवाय तरणोपाय नाही असेही ते शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.महावीर अक्कोळे यांनी तरुण विद्यार्थीनी पुढाकार घेऊन सेवाभावी वृत्तीने कार्य केले पाहिजे याविषयी गांधीजींचे जादूचा ताईत या विषयी भाष्य करून विद्यार्थ्यांना जगण्याचा उत्तम व सकारात्मक मार्ग दाखवला. तसेच किल्लारी भूकंपाचे व्यवहारवादी व वास्तव उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना सेवाभावी कार्य करण्यास प्रेरित केले.
यानंतर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2021 मध्ये काम केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना डॉ.पांडुरंग खटावकर, डॉ.महावीरअक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या मंथन महिंद व गणेश कुरले या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विशेष सत्कार सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय सेवक बाहुबली भनाजे यांचा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्तम आभार प्रदर्शन प्रा मेहबूब मुजावर यांनी मानले. कु.शुभांगी ठोंबरे व जीवन आवळे यांनी मधुर सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये NSS प्रतिनिधी गणेश कुरले व इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा