डॉ. अमोल मोरे यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपूर : शाहूनगर येथील जय भवानी कला,क्रीडा मंडळ येथील अक्कोळे हॉस्पिटल जवळील तसेच शिवाजी वठारे आणि पवार सर यांच्या घराजवळील बंद अवस्थेत असलेले हातपंप (borewell) संवेदनशील डॉ.अमर मोरे यांच्या स्वखर्चाने दुरुस्त करून येथील लोकांच्या पाणी तुटवड्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला.
या भागातील हातपंप दुरुस्त नसल्यामुळे लोकांची पाण्याची समस्या गंभीर होत चालली होती अशावेळी सामाजिक दातृत्व दाखवीत जयसिंगपूरचे संवेदनशील तरुण डॉ. अमर मोरे यांनी स्वखर्चातून हातपंप दुरुस्त करून तेथील लोकांना दिलासा दिला.तसेच या कार्याबद्दल डॉ.अमर मोरे यांचा आभार मानून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.महावीर अक्कोळे,माजी नगरसेवक गुंडापा पवार,बबलू शिंदे, बाबू बेदमुथा,प्रशांत कुलकर्णी,राजेंद्र निर्मळ, बंडू उरणकर,शिवाजी वठारे,बाळकृष्ण पवार सर, बेले साहेब,बापू धोत्रे, पवन सुतार, अनिल सुतार,इब्राहिम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.अमर मोरे यांनी केलेलं काम खरोखरच उल्लेखनीय असून समाजातील इतर घटकांनाही ही आदर्शवत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा