शिरोळ पोलिसांनी सराईत मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळया |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील सराईत चोरटयास पकडण्यास शिरोळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.
शिरोळ पोलीस ठाणेकडील एक व शिरोली MIDC पोलीस ठाणे हददीतील एक अश्या २ कबुली संशयित आरोपीकडुन ११ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल एकुण ८०,०००/- व गुन्हयात मोटारसायकल ६५,०००/- असा एकुण १,४५,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त केल्याची कबुली संशयित गुन्हेगाराने दिली.
शिरोळ पोलीस ठाणे गुन २२८/२०२१ मा.द.वि.स.कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी माधुरी संदीप देवकुळे वय ३२ रा.दिनबंधु हौससँग सोसायटी, जयसिंगपुर ता. शिरोळ यांनी फिर्याद दिली की दिनांक २५/०९/२०२१ रोजी दुपारी १४.३० ते १५.०० वाचे सुमारास फिर्यादी यांच्या राहते घरातील हॉलमधील खिडकीमध्ये ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने उघडया घरात प्रवेश करुन फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेलेबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे शिरोळ पोलीस ठाणे यांनी गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून सखोल तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व मोबाईलच्या तांत्रीक माहीतीच्या आधारे गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी अनिल विश्वनाथ चौगुले य.व ४७ रा. धुळगाव ता. तासगाव जि. सांगली यास तासगाव शहर परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवून सदर गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली.
सदर संशयित गुन्हेगाराने शिरोळ पोलीस ठाणेकडील गुन्हयाची तसेच हालौंडी ता.हातकणंगले येथुन उघडया घरात प्रवेश करून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीची कसुन चौकशी करून त्यांचे तावेतुन ११ वेगवेगळ्या कंपनीचे ८०,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल व गुन्हयात वापरलेली होंडा अॅक्टीवा मोटारसायकल नं MH-10-CF-6078 किमत ६५,०००/- असा एकुण १,४५,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर आरोपीस गुन्हयाच्याकामी अटक करणेत आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो. हे कॉ १२६६ सरनाईक हे करीत आहेत.
आरोपी अनिल विश्वनाथ चौगुले याच्या नावे तासगाव पोलीस ठाणे,आष्टा पोलीस ठाणे, इस्लामपुर पोलीस ठाणे,विटा पोलीस ठाणे व पोलीस ठाणे या पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद असून तो अट्टल गुन्हेगार आहे.
सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सोर कोल्हापुर, मा. जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा. रामेश्वर येजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर, पोलीस निरीक्षक डी. एस. बोरीगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ अशोक सरनाईक, पो.हे. का ज्ञानेश्वर सानप, पो.हे.कॉ हनुमंत माळी, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, संजय राठोड, युवराज खरात या पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा