Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

*आई वृध्दाश्रमाचे अध्यक्ष संजय भोसले राज्यस्तरीय नव्या युगाचा श्रावणबाळ गौरव पुरस्काराने सन्मानित..*


पुरस्कार प्रदान करताना मा.दत्तात्रय बोरिगिड्डे


गणेश कुरले  : विशेष प्रतिनिधी


  हरोली : भीमक्रांती सोशल फाउंडेशन, हरोली यांच्या मार्फत समाजामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते,गेली ३० वर्षांपासून त्यांचे हे कार्य अखंडितपणे सुरू आहे. यंदा आई वृध्दाश्रमाच्या कार्याची दखल भिमक्रांती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी घेऊन आई वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांना राज्यस्तरीय नव्या युगाचा श्रावणबाळ गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. 

       सदर पुरस्कार शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरीगिड्डे, मनसेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव ,  जिल्हा परिषद सदस्या - स्वाती सासणे , जेष्ठ पत्रकार - दगडु माने , शिरोळचे नगराध्यक्ष - अमरसिंह पाटील , यांच्या हस्ते देण्यात आला. 

     सदरचा पुरस्कार हा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. मला चालना आणि प्रोत्साहन देणारा आहे. नक्किच आणखीन चांगले काम करण्यासाठी मला हा पुरस्कार शंभर हत्तींचे बळ देईल. असे प्रतिक्रिया पुरस्कार मिळाल्यानंतर आई वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. तसेच पुरस्कार मिळाल्या बद्दल भिमक्रांती सोशल फाउंडेशनचे व अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचे त्यांनी आभार मानले.

  यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि भिमक्रांती सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक भाषण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा