ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार द मा मिरासदार कालवश |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
आपल्या विनोदी लेखनाने वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार प्रा. दत्ताराम मारुती ऊर्फ द. मा. मिरासदार (वय 95) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
अकलूज येथे 14 एप्रिल 1927 रोजी मिरासदार यांचा जन्म झाला होता. अकलूज आणि पंढरपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर ते पुण्यात आले. एम. ए. पदवी संपादन केल्यावर काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून 1952 मध्ये ते अध्यापन क्षेत्रात आले. 1961 मध्ये ते मराठीव्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या तिघांनी 1962 पासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथनाचा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. एकत्रित कथाकथनाचे त्यांनी तीन हजारांहून अधिक कार्यक्रम केले. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत मिरासदार बोलू लागल्यावर श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळायचे. कोलकत्ता, इंदौर, हैदराबाद अशा शहरांतून त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. कॅनडा आणि अमेरिकेमध्ये 25 कार्यक्रमांचा विक्रमही त्यांनी केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा