Breaking

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

स.गा.म.कॉलेजमध्ये संख्याशास्त्र विभागाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन : प्राचार्य डॉ.मोहन राजमाने

 

सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड

मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक

 कराड : येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संख्याशास्त्र विभागाच्या आंतरराष्टीय चर्चासत्राचे ११ व १२ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे.      

             ’संख्याशास्त्रामधील आव्हाने’ (International Conferences on “Recent Advances in Statistics”) या विषयावर ऑनलाईन पद्धतीने चर्चासत्राचे आयोजन केले आहे.सदर चर्चासत्रात अमेरिका,कॅनडा इत्यादी देशासह भारतातील विविध राज्यातील नामांकित संख्याशास्त्रज्ञ व विविध विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

     या चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते होणार असून रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं.डॉ.व्ही.एस.शिवणकर अध्यक्षस्थानी आहेत.संख्याशास्त्र विषयाच्या संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मा. प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सुवर्णा पाटील(मो .९६०४४३३४२७) यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा