माजी विद्यार्थी |
*प्रा.डॉ.महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये NAAC च्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थ्यांची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.
ही सहविचार सभा या महिन्यातील दिनांक २७ व २८ ऑक्टोबर,२०२१ रोजी महाविद्यालयास NAAC पिअर टीमच्या भेटी संदर्भातची पूर्व तयारी व विविध क्षेत्रातील माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या सभेचे स्वागत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.ए. ए. पुजारी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
प्रसंगी IQAC कॉर्डिनेटर प्रा.डॉ. संदीप साबळे यांनी गेल्या काही वर्षात कॉलेजच्या शैक्षणिक व मूलभूत सोयीसुविधा बदलाची परिपूर्ण माहिती दिली तसेच NAAC पिअर टीम सोबत होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या संवाद बैठकीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. प्रशांत चिक्कोडे यांनी कॉलेजमधील ग्रंथालय, इनडोअर स्विमिंग टॅंक व इतर मुलभूत सोयी सुविधांचा परिपूर्ण वापर माजी विद्यार्थी करू शकतात याबाबत त्यांनी माहिती दिली.
तसेच विशेष मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सूरत मांजरे यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा व कलेचा लाभ माजी विद्यार्थी व समाजासाठी व्हावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी विद्यार्थी संघटनेकडून डॉ.मांजरे यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल,निर्भीड पत्रकार मा.दगडू माने,डॉ.विजय डोंगरे,डॉ. निंबाळकर,डॉ. नंदकुमार कुंभार व कु.प्राजक्ता पाटील या गुणवंत्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सिनेकलाकार व पत्रकार दगडू माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत जयसिंगपूर कॉलेज ज्ञानदाना बरोबर संस्कार व करियर घडवणारी एक उच्च कोटीची संस्था आहे. तसेच उदय शिरोळकर यांनी आपल्या काळातील जुन्या आठवणीं कविता व गाण्याच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी डॉ. विजय डोंगरे,प्राजक्ता पाटील व प्रा. बाळगोंडा पाटील यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महावीर बुरसे व प्रा.संदीप परीट यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. या प्रसंगी पत्रकार बंधु रतन शिकलगार, इकबाल इनामदार, नामदेव भोसले, हुसेन शेख, मालोजीराव माने व जीवन आवळे हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व एन.एस.एस.विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
सदर सहविचार सभेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटना सक्षम करण्याचा प्रयत्न व NAAC Peer टीमशी संवाद साधून कॉलेजच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा निश्चय करण्यात आला.
Very nice &All the best 💐
उत्तर द्याहटवाThank you
हटवा