नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते मा.दत्तात्रय बोरिगिड्डे यांचा सन्मान |
गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ : रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कायदा, सुव्यवस्था राबवणाऱ्या पोलीस प्रशासनाचा गौरव करुन रोटरीने सामाजिक सलोखा जपला आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ यांच्यावतीने जागतिक पोलीस दिन साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा रोटरीकडून गौरव करण्यात आला. रोटरीच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
प्रारंभी रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे यांनी स्वागत करुन रोटरीच्या कार्याचा आढावा विशद केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डीसीसी फोरवे टेस्टचे रोटेरियन मिलिंद भिडे यांनी रोटरीचे कौतुक केले. रोटरीकडून झालेल्या सन्मानाबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
या प्रसंगी अविनाश टारे, पंडीत काळे, संतोष काळे, शरद चुडमुंगे, नितीन शेट्टी, धैर्यशील पाटील, अतुल टारे, प्रताप देसाई यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संतोष काळे तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.
रोटरीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा