Breaking

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्या तालुकाध्यक्षपदी अजय मिरजकर व उपाध्यक्षपदी दत्ता पोरे यांची निवड

 

मा.अजय मिरजकर व मा.दत्ता पोरे


करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी


    श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी अजय मिरजकर, उपाध्यक्षपदी दत्ता पोरे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र कार्यशील व संवेदनशील व्यक्तिमत्व व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.सुरेश पुकाळे यांनी नुकतेच सुपूर्द केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. विनायक तांदळे, डॉ.अभिमन्यू खटावकर, डॉ.पी.एम.गाणबावले, सुनील वायचळ,दिलीप गाणबावले, विजय खटावकर, पंचशील वायचळ, केशव वायचळ, संजय वायचळ व कृष्णकांत आंबेकर, वसंत वनारसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. त्याचबरोबर नामदेव युवा ग्रुपचे चतुर वायचळ, राजेंद्र कुडाळकर,अजय पुकाळे, नंदकुमार उरुणकर,शुक्राचार्य उरुणकर ,सुरज बुरांडे, अभिषेक काकडे,अभिषेक गाणबावले, पराग गाणबावले, शुभम बुरांडे, अमित वायचळ, संतोष पोरे,ओंकार मुळे, चंद्रकांत पिसे, प्रवीण गाणबावले,अक्षय पुकाळे, श्रीपाद पतंगे,अक्षय पतंगे, अमोल हावळ,आशिष उंडाळे, धिरज काकडे, अमर महेंद्रकर, ऋषिकेश कणीरी, अरुण कणीरी, संतोष हावळ,राजू पोरे, श्रेयस पेटकर, दीपक पोरे व करण व्हावळ हे तरुण उपस्थित होते. त्यांच्या निवडीनंतर पदाधिकारी मिरजकर व पोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

         मुळात हे दोन्ही तरुण अर्थात मिरजकर व पोरे यांनी विद्यार्थीदशेत त्याचबरोबर युवा मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी जपत समाज बांधवाच्या बरोबर तसेच इतर समाजासाठी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात समाजातील तसेच इतर गरीब व गरजू घटकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप, मास्क व सॅनीटायझर वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, सामाजिक जाणीवा निर्माण होण्यासाठी केलेले प्रबोधनात्मक कार्य व सन २०१९ च्या शिरोळ तालुक्यातील महापुरात केलेली उत्तम कामगिरी पाहता या दोन्ही युवा पदाधिकाऱ्याची योग्य निवड झाली आहे अशी प्रतिक्रिया समाजबांधवा कडून होत आहे.

    सरतेशेवटी समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राष्ट्रनिर्माण कार्यात दोघांचा निश्चितच उत्तम योगदान राहील अशी अपेक्षा आहे. या दोघांच्या निवडीने शिरोळ तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा