Breaking

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

दत्तवाडमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

दत्तवाड मध्ये वरिष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा

  रमेशकुमार मिठारे : दत्तवाड प्रतिनिधी


     शिरोळ तालुक्यातील दत्तवाड  येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसो चौगुले व बंडा परीट यांच्या विशेष प्रयत्नाने दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ वयोवृद्ध श्रीमती ताराबाई दत्ता पुजारी वय 96 वर्षे, दस्तगीर इमाम पाकजादे वय वर्षे 92 व मारुती महादेव सूर्यवंशी वय वर्षे 85 अशा या ज्येष्ठांचा सत्कार सरपंच  चंद्रकांत कांबळे व प्रा.जे.पी.जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

     या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रा.जे पी जाधव  यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले,आज समाजात ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे व त्यांच्या आरोग्याच्या सोयी चांगल्याप्रकारे होण्याकरता यासाठी घरातील कुटुंबांनी योग्य प्रकारे त्यांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे कारण त्यांच्या  वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधी साठी वैद्यकीय उपचारांची गरज या वयात असते कारण म्हातारपण हे नैसर्गिकतेने बहाल केलेले दुसरे बालपण होय त्याकरिता ज्येष्ठांचे ही शारीरिक व मानसिक आणी आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करून आपला आयुष्य जास्तीत जास्त कशा प्रकारे टिकवावा याबद्दल महत्वपूर्ण माहिती या कार्यक्रमावेळी दिले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच चंद्रकांत कांबळे प्रा. जे.पी. जाधव, बाबा महाराज मठाचे श्री भालचंद्र पाटील ,ग्रामपंचायत सदस्य नूर काले, श्री शशिकांत उपाध्ये ज्येष्ठ पत्रकार रमेशकुमार मिठारे व मिलिंद देशपांडे आदी मान्यवरांसह माजी सरपंच कुबेर कल्लाप्पा कमते दत्तात्रय सुतार सुभाष शेंडगे, गुलाब अली मुल्ला, मारुती कुंभार, विष्णू खरपी आणि धनपाल सुरवंशी आधी ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रमेशकुमार मिठारे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक भाऊसो चौगुले व आभार बंडा परीट यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा