जेसीबी मशिनचे पूजन करताना |
हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तेरवाड तलाठी कार्यालयात कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड यांच्या वतीने गांधी जयंती साजरी करण्यात आली या वेळी गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन तेरवाड गावच्या सरपंच सौ लक्ष्मी परशुराम तराळ,ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभा गोविंद आवळे, सौ लक्ष्मी घटनटे यांनी केले, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बंडगर,राजू पैलवान सुखदेव घटनटे, संतोष भुयेकर सर,मुरग्याप्पा हेगडे, उमेश शेडबाले, शशिकांत सनदी, अमोल खोत,चरण कांबळे, सुरेश शेडबाले, संजय मोहीते, स्वप्नील बिरजे, शिवाजी मांग,विपुल कांबळे, संजय माने, अरविंद कोरे, सुखदेव हेगडे,बाबू मुल्ला उपस्थीत होते.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै.गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाडच्या वतीने जेसीबी आणि मातंग समाज संघटना गंगापूर यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीच्या सहकार्याने संपूर्ण गावातील प्लास्टिक कचरा व घाण दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच संपूर्ण भागात जंतुनाशक पावडरची फवारणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांचे योगदान लाभले, या सामाजिक कामाचे तेरवाड व परिसरातील लोकांनी विशेष कौतुक करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा