Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

रुकडी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लबच्या वतीने ऑक्सीजन पार्कमध्ये वृक्षारोपण

 

एन एस एस व रोटरी क्लब वृक्षारोपण करताना


सौंदर्या पोवार  : विशेष प्रतिनिधी


   रुकडी  येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल  आणि आधार फाऊंडेशन रुकडी यांच्या संयुक्त्त विद्यमाने रुकडी येथील रेल्वे स्टेशन परिसरात साकारत असलेल्या ऑक्सीजन पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 

      यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे, रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो. यतिराज भंडारी, सेक्रेटरी रो.राजू तारदाळे, आधार फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संदीप बनकर, आधार फाऊंडेशनचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील शिक्षक, रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरिश मोरे व डाॕ. शंकर दळवी यांनी केले.

       या वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा