Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

रुकडी कॉलेजचे प्रा.डॉ.उत्तम पाटील हे आऊट स्टॅंडिंग टीचर्स अॕवार्ड या पुरस्काराने सन्मानित

 

डॉ.उत्तम पाटील रोटरी क्लबच्या वतीने सन्मानित करताना

हिना मुल्ला :  विशेष प्रतिनिधी


     रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. उत्तम पाटील यांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल , रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्यूटिव्ह यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण केलेल्या कार्याची दखल घेऊन आऊट स्टॅंडिंग टीचर्स अॕवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. 


    डॉ. उत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती नाहीशी करून सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे  धडे देऊन इंग्रजी विषयात गोडी निर्माण केली आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त्ती, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविले आहेत. 

      त्यांना बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदर डॉ. निवेदिता माने सचिव खासदार धैर्यशील माने यांचे प्रोत्साहन  मिळाले. अॕवार्ड प्रदान कार्यक्रम नुकताच इचलकरंजी येथे रो. व्यंकटेश ऊर्फ बबन देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रो. डॉ. गिरीश मसुरकर, रो. सुमती अग्रवाल, रो. नागनाथ बसूदे, रोटरीच्या तीनही क्लबचे सदस्य,शिक्षक आदी उपस्थित होते.

      या उल्लेखनीय कामगिरी व पुरस्काराने गौरवण्यात आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे, महाविद्यालतील सर्व  शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी  यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा