Breaking

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

मुंबई येथे कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांचा आदर्श संस्था अध्यक्ष म्हणून गौरव

 

उमेश आवळे यांना पुरस्कार देऊन गौरव


गीता माने  : सहसंपादक


   जयसिंगपूर :  मुंबईत गेली ९० वर्षे लोकप्रिय असलेले दैनिक नवभारत व नवराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोकांचा सत्कार करण्यात आला.संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लोकांचा समावेश करण्यात आला होता त्या मध्ये शिरोळ  तालुक्यातील कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांचा आदर्श संस्था अध्यक्ष म्हणून गौरविण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री मा. सुनिल केदार  तसेच खासदार मा. संजय राऊत यांच्या हस्ते व मा.निमीश महेश्वरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


      हा गौरव स्विकारत असताना उमेश आवळे, आमगौडा पाटील, उदय मिसाळ सर, उमेश शेडबाले, शशिकांत सनदी, विजय गायकवाड, कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड ची योग्य दखल घेऊन आम्हाला पुरस्कार दिले बद्दल दैनिक नवभारत व नवराष्ट्र तसेच पत्रकार सुरेश कांबळे व दिपक घाटगे यांनी या कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल उमेश आवळे यांनी त्यांच्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले.

       फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे हे अत्यंत प्रामाणिक व सामाजिक संवेदनशील व्यक्ती म्हणून तालुक्यात लोकप्रिय आहेत. आज तागायत आवळे यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या सामाजिक कामाचे वैशिष्ट्य म्हणजे विधायक व रचनात्मक कामाला प्राधान्य देणे होय यामुळे समाजातील अनेक घटकांचा फायदा झालेला आहे. जय हिंद न्यूज नेटवर्कशी  बोलताना ते म्हणाले, आमच्या संस्थेचे  कार्य हे अविरतपणे समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध व वंचित घटकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे.

      तेरवाड सारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या उमेश आवळे यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान व जाण ठेवणाऱ्या एका त्यागी व्यक्तिमत्वाचा गौरव होणे असा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा