डॉ. विजय कुंभार धनंजयराव गाडगीळ कॉलेज,सातारा |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजय कुंभार यांच्या संशोधनास ए.डी. सायंटिफिक इंडेक्स या मिशिगन युनिव्हर्सिटी मधील संशोधक प्राध्यापकांनी तयार केलेल्या जागतिक निर्देशांकात अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग या विषयात संशोधन करणाऱ्या जगभरातील सर्व संशोधकांचे शोध निबंध व त्यास प्राप्त झालेले सायटेशन एच इंडेक्स व आय-टेन इंडेक्सच्या आधारे हा जागतिक निर्देशांक तयार केला जातो. या निर्देशांकात डॉ. विजय कुंभार यांना सन २०२० मध्येही मानांकन प्राप्त झाले होते तसेच सन २०२१ मध्ये देखील त्यांच्या संशोधनास या इंडेक्स मध्ये अव्वल स्थान प्राप्त झालेले आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सामाजिक शास्त्रे तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांमध्ये डॉ. कुंभार यांच्या संशोधनास जागतिक पातळीवर मानांकन प्राप्त झाले असून या 'व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग' विषयातील जगभरातील संशोधकांमध्ये त्यांचा भारतात ११ वा तर आशिया खंडात ३६ वा आणि जागतिक पातळीवर १२७ व्या स्थानी आहेत.
डॉ. विजय कुंभार यांचा विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंतचा प्रवास हा संशोधनात्मक राहिला आहे. अत्यंत तरुण व कार्यशील प्राध्यापक, उत्तम वक्तृत्व, खूप नम्र, संयमी,अभ्यासू, संशोधनात्मक जिज्ञासा व विद्यार्थीप्रिय अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दिसून येतात. डॉ कुंभार यांनी जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. वसंतराव जुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.कुंभार यांनी 'ई-बँकिंग सर्विसेस अँड कस्टमर्स सॅटीस्फॅक्शन' या विषयातून पीएच.डी. पदवी संपादित केलेली आहे.
आज तागायत एकूण बारा पुस्तकांचं लिखाण, २ मायनर व १ मेजर प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. डॉ.विजय कुंभार यांची संशोधनात्मक पकड मजबूत असल्यामुळे ते विविध संस्थांमध्ये संशोधन समितीवर कार्यरत असुन ते 'रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट' (RIRD) संस्थेच्या संशोधन सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत, डॉ. कुंभार हे 'दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बॅंक लि.सातारा' या २२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बँकेचे चेअरमन होते व सध्या या बॅंकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा या बँकेच्या प्रगतीसाठी ही होत असून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आजतागायत ५८ रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले असून २१ रिसर्च पेपर्स राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केलेले आहेत. संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांचं हे कार्य पाहता विविध स्वायत्त संस्थेच्या अभ्यास मंडळावर त्यांची निवड झाली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा जागतिक स्तरावरील अत्यंत नावाजलेल्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये स्थान मिळणे हे शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था व अर्थशास्त्राच्या संशोधनात्मक गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत कौतुकस्पद व अभिमानास्पद आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेणकुदळे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने,प्राचार्य डॉ. बी.टी. जाधव, प्रा.डॉ.वसंतराव जुगळे तसेच सर्व सहकारी प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. तसेच सामाजिक शास्त्रातील ते एकमेव प्राध्यापक असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा