अब्दुल कलाम जयंती सोहळा |
प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
श्री बाहुबली विद्यापीठ संचलित श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे डॉ ए.पी.जे . अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री महावीर जिन्नाप्पा रायनाडे व सौ शुभांगी महावीर रायनाडे हे उपस्थित होते.यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. एक दिवस पुस्तक वाचन हा उपक्रम राबविला.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सौ. शुभांगी रायनाडे यांनी आई-वडील व शिक्षक यांचा आदर्श मुलांनी ठेवावा असे त्या म्हणाल्या.त्याचबरोबर मुलांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये दानराशी जाहीर केले.त्याचबरोबर श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाटची विद्यार्थिनी कु.विणा उल्हास मलिकवाडे हिचा आय. आय. टी व एन.आय. टी या परीक्षेत गुणवत्ता यादीत समाविष्ट झाल्याने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.ए.मगदूम सर होते.स्वागत व प्रास्ताविक जे.आर.चावरे सर यांनी केले. सौ.एस.वाय.पाटील मॅडम यांनी डॉ.कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला.तर सूत्रसंचालन पी.बी.मगदूम सर यांनी केले. आभार जे.ए.कल्याणी सर यांनी केले.कार्यक्रम सानंद संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा