केंद्रीय पथका समोर युवा सेनेने केली मागणी |
*प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
आज नृसिंहवाडी येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर पूरग्रस्ताची कैफियत मांडली. तसेच नृसिंहवाडी हे 100% पूरग्रस्त गाव असून त्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी युवासेना तालुका अधिकारी प्रतिक धनवडे यांनी मागणी केली.
केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेतकऱ्यांचे, दुकानदारांचे व घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून केंद्र शासनाकडून मदत मिळाल्यास त्यांना त्याचे वितरण करता येईल, असे सांगितले.
या केंद्रीय पथकाचे प्रमुख वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनीष कुमार, तर सदस्य नागपूर येथील जलशक्ती चे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, सनदी अधिकारी प्रताप जाधव यांचा समावेश आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख पथकासोबत उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा