Breaking

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

साताराच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात जमनालाल बजाज उपक्रमांतर्गत व्याख्यानात गांधीजींच्या आर्थिक विचारांचं मंथन

 

व्याख्यानमालेतील सर्व मान्यवर घटक


 'जगत कल्याण ही स्वयं कल्याण' हा गांधीजींचा वैश्विक विचार अर्थव्यवस्थेला तारणार : ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.जे.एफ.पाटील

 

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


सातारा  : रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा अर्थशास्त्र विभाग आणि मराठी अर्थशास्त्र परिषद,  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. जमनालाल बजाज उपक्रमांतर्गत महात्मा गांधीचे आर्थिक विचार या विषयावर विशेष व्याख्यानाचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ञ मा.प्रा.डॉ.जे.एफ.पाटील ,कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षस्थानी ऑडीटर प्रि.डॉ.शिवलिंग मेनकुदळे,सातारा व कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रि.डॉ. अनिल सुर्यवंशी,अध्यक्ष मराठी अर्थशास्त्र हे होते.

        प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना प्रा. डॉ.एस.एम.भोसले (प्रमुख अर्थशास्त्र विभाग) म्हणाले की, मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या माध्यमातून विविध व ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्याचे काम केले जाते. त्याचाच भाग म्हणून स्व: जमनालाल बजाज  उपक्रमांतर्गत महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करून सांगोपांग पद्धतीची वैचारिक शिदोरी देण्याचा उदात्त हेतू आहे.यानंतर परिषद अहवाल वाचन कार्यवाह- खजिनदार डॉ. मारुती तेगमपुरे यांनी सविस्तरपणे केला.कार्याध्यक्ष डॉ. के.के.पाटील यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

       या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले की, गांधीजी सारखी विभूती या विश्वात न होण्यासारखे आहे  असे म्हणत त्यांनी गांधीजींच्या अर्थशास्त्राची मांडणी केली. गांधीजी स्वदेशीचे पुरस्कर्ते होते;स्वदेशीचा विचार अर्थशास्त्राच्या दृष्टीने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न हा महत्त्वाचा होता. गांधीजींनी यंत्राला विरोध केला नाही मात्र नको त्या ठिकाणी यंत्र वापराला विरोध केला कारण माणसाच्या हाताला काम मिळणे आवश्यक असून तत्कालीन परिस्थितीचा विचार करिता आर्थिक विकास, श्रम प्रतिष्ठा महत्त्वाची होती. त्यांनी महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळ, स्वयंपूर्ण खेडे, विश्वाची कल्पना,मोठ्या उद्योगांना विरोध ,लघु उद्योग विकास व श्रमप्रतिष्ठा यासारख्या आर्थिक विकासाला प्रेरणा देणाऱ्या व विचारमंथन करणाऱ्या घटकांवर डॉ. पाटील यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच खादीचा आग्रह, सत्य व अहिंसावर भर,चरख्याचे महत्त्व यासारख्या घटकांचे उत्तम विवेचन केले. सरते शेवटी ते म्हणाले, 'जगत कल्याण : स्वयम् कल्याण'  हा विचार मांडला.

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉ.अनिल सुर्यवंशी म्हणाले, मराठी अर्थशास्त्र परिषद समस्त प्राध्यापक व विद्यार्थी घटका बरोबर समाजाच्या कल्याणचा सर्वकष विचार करते. त्यामुळे आजचा व्याख्यानाचा विषय हा तमाम घटकांना   विचारप्रवण करणारा, प्रेरणादायी व लाभदायी आहे असे ते म्हणाले.

      हा व्याख्यानाचा आभासी कार्यक्रम गुगल मीटिंग लिंकवर आयोजित करण्यात आला होता यासाठी तांत्रिक सहाय प्रा. दिलीप पवार यांनी उत्तम पद्धतीने केले.

  सदर कार्यक्रमास संपादक-अर्थसंवाद डॉ.राहुल म्होपरे, उपप्राचार्य डॉ.एस.एस.घार्गे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सदस्य-प्राध्यापक व अन्य घटक मोठ्या संख्येने उपस्थित होता.

     या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गजानन खामकर यांनी केले. तर सूत्रबद्ध व उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ. लतिका पाटील यांनी केले.

       प्रेरणादायी कार्यक्रमाचे व आयोजनाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा