Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून गळ्यातील दागिने हिसडा मारून पळून जाणाऱ्या हातकणंगले येथील दांपत्यास कोल्हापूर पोलिसांनी केले जेरबंद.



 गाडीवरून जाताना महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत अडवायचे आणि त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळून जाणाऱ्या दांपत्यास कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या जोडप्याने तीन ठिकाणी महिलांचे दागिने हिसडा मारून लंपास केल्याची कबुली दिली आहे. अल्फाज आप्पासो जमादर, वय - 28 आणि रूपाली उर्फ जोया जमादार दोघे राहणार आळते ता. हातकणंगले अशी या दोघांची नावे आहेत.




गेल्या आठवड्यात शिंगणापूर ग्रामीण भाग तसेच जवाहर नगर येथे महिलांचे दागिने गाडीवरून हिसडा मारून चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. हे दांपत्य दागिने घातलेल्या एखाद्या महिलेला हेरून पत्ता विचारण्यासाठी अडवत व अचानक गळ्यातले व कानातले दागिने हिसडा मारून पळून जात.या चोरांना पकडण्यासाठी ग्रह पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी विशेष शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे पथके तयार केली होती. 

    या पोलिस पथकाचे या मार्गावर गस्त चालू असता हे जोडपे संशयास्पद हालचाल करताना पोलिसांनी या दोघांना अटक केली, तेव्हा यांच्याकडे सोन्याची अंगठी मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.





Photo source - maharashtra times

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा