Breaking

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

सिंधुदुर्ग; चिपी विमानतळाचे उद्घाटन; मुख्यमंत्री ठाकरे व नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

Photo source. मटा



      सिंधुदुर्ग: बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन आज संपन्न होत आहे. उद्घाटन कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. शिवसेना व नारायण राणे यांच्यात विमानतळाच्या उद्घाटनासंदर्भात दोन्ही बाजूंकडून विविध वक्तव्ये केली गेल्यामुळे हे विमानतळ चर्चेत होते. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत राणे यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांनतर त्यांना झालेली अटक असा वाद तीव्र बनला होता. यामुळे विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम कसा पार पडेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

       मात्र, निमंत्रण पत्रिकेत राणेंना देण्यात आलेले खालचे स्थान आणि नावाचा लहान आकार याबाबत राणेंनी नाराजी व्यक्त केली असली, तरी देखील ते आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर दिसणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे. 

आमंत्रण नसल्याने भाजपचा मात्र बहिष्कार

चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही उशिरापर्यंत मिळाले नसल्यामुळे  भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा