Breaking

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

*जयसिंगपूर पोलीसांनी मोटर सायकल चोरट्यास केलं जेरबंद*


जयसिंगपूर पोलिसांनी दुचाकी चोरट्यास केलं जेरबंद


प्रविणकुमार माने : उपसंपादक


  जयसिंगपूर पोलीस ठाणे ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील पोलीसांकडून सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात यश आलेले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी  मोतीलाल मुरारी सुर्यवंशी रा. टाकवडे ता. शिरोळ यांनी त्यांचे मालकीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस कंपनीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत फिर्याद दिली होती. त्याबाबत शिरोळ पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूदध भा.दं.सं.कलम 379 प्रमाणे गु.र.नं. 218/2021 ने गुन्हा दाखल केलेला आहे.

      सध्या जयसिंगपूर पोलीस ठाणे हददीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोरी सारखे गुन्हे घडत आहेत त्याअनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग असताना क्रांती चौक वृंदावन हॉटेल समोर जयसिंगपूर येथे १९.५५ वा.चे सुमारास बिरबल भूपाल पुजारी वय २९ रा. टाकवडे ता. शिरोळ जि. कोल्हापूर हा बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेवून जात असताना दिसलेने त्यास अडवून त्याचेकडे गाडीला नंबर प्लेट नसलेबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागलेने त्यांस विश्वासात घेवून त्याचेकडे सदर मोटारसायकलचे मालकाबाबत विचारपूस केली असता त्यांने त्याचेजवळ असलेली मोटारसायकल टाकवडे गांवातील कागले गल्ली येथुन दि. १४/०९/२०२१ रोजी रात्रौ १०.३० वा. चे सुमारास मोतीलाल मुरारी सुर्यवंशी यांचे राहते घराचे समोरून चोरून आणले आहे असे सांगितले. त्याप्रमाणे शिरोळ पोलीस ठाणेस अधिक चौकशी केली असता गु.र.नं. २१८/२०२१ भादविस ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाचे विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. सदरची मोटारसायकल ही सदर गुन्हयातीलच चोरली असल्याचे संशयित आरोपी नामे बिरबल भूपाल पुजारी वय २९ रा. टाकवडे ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांने कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील  चोरीस गेलेली मोटारसायकल पोलीसांकडून जप्त करण्यात आली असून आरोपी यांस शिरोळ पोलीसांनी अटक केलेली आहे.सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे सो पोलीस अधीक्षक  कोल्हापूर, मा. जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा. रामेश्वर वैजने सो उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोना ५६७ सागर सुर्यवंशी, पोकॉ ८८५ संदेश शेटे, पोकॉ २३८५ अमोल अवघडे, पोकॉ १३३३ रोहित डावाळे, पोकॉ २४२८ शशिकांत भोसले, पोकॉ २५४५ वैभव सुर्यवंशी तसेच होमगार्ड सनदी नं १०११ दिपक गाडीवडर इत्यादींनी केलेली आहे.

     सदर कारवाईमुळे शिरोळ पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा