आज डिजिटल भारत संकल्पनेतून संपूर्ण भारत डिजिटल होत आहे. सोबतच सर्व आर्थिक व्यवहारही डिजिटल स्वरूपात होत आहेत. यासाठी दैनंदिन जीवनात गुगल पे ( Google pay ), फोन पे ( phone pay ), पेटीएम (Paytm) ई. मोबाईल ॲप्स (mobile apps) आपण वापरतो. ज्याद्वारे आपले आर्थिक व्यवहार सुकर झाले आहेत.
पण कधी कधी आपले मोबाईल चोरीला जाण्याची शक्यताही असते ( किंवा हरवण्याची), आणि असे झाल्यास आपल्या आर्थिक ॲप्स जसे गुगल पे/फोन पे वरून पैसे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मान्य आहे की, हे इबँकिंग अॅप आपल्या फिंगरप्रिंट किंवा UPI पिन शिवाय उघडू शकत नाही , पण तंत्रज्ञानाच्या काळात चोर या सर्वांमध्ये जरा अधिकच चतूर असतात.
जर कधी असे झाल्यास घाबरून न जाता या सोप्या पद्धतीने आपले गुगल पे(Google pay), फोन पे (phone pay) अकाऊंट घरबसल्या बंद करून आर्थिक नुकसानीपासून वाचू शकता.
फोन चोरीस गेल्यास किंवा हरवल्यास गुगल पे ( Google pay), फोन पे (phone pay), Paytm अशा सर्व ई बँकिंग सुविधा कंपन्या आपल्याला सोप्या पद्धतीने अकाऊंट बंद करण्यासाठी हेल्प लाईन नंबर देतात, ज्यावर कॉल करून आपण आपल्या खात्या संदर्भात जुजबी माहिती देवून ( हे खाते आपलेच आहे हे सिद्ध करण्यासाठी) आपण आपले अकाऊंट सहज बंद किंवा तात्पुरता लॉग आऊट ( Log out) करू शकतो. व आपणास हवे तेव्हा पुन्हा सुरू करू शकतो.
हे आहेत हेल्प लाईन नंबर
१) गुगल पे ( Google pay) - 18004190157
२) फोन पे ( Phone pay ) - 08068727374 किंवा 02268727374
३) पेटीएम (Paytm ) - 01204456456
Photo source - pinterest
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा