Breaking

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

शिरोळ : शिरटीच्या वेदांतची IIT हैदराबादमध्ये निवड


जेईई मेन्सला संपूर्ण भारतात 56 वी तर ऍडव्हान्सला 142 वी रँक

वेदांत भंडारे

आदिनाथ पाटील - अकिवाट प्रतिनिधी


    IIT मध्ये निवड होण्याला किती महत्व आहे ,हे अगदी इंजिनियर लोकांपासून ते अशिक्षित लोकांपर्यंत सर्वश्रुत आहे. दर साली लाखो विद्यार्थी IIT च्या उद्देशाने प्रयत्न करतात पण त्यातील काहीच यशस्वी होतात आणि त्याच यादीत शिरोळ तालुक्यातील शिरटीच्या वेदांत तायप्पा भंडारे याने नाव कोरलयं.

   संजय घोडावत विद्यापीठात कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण घेतलेल्या वेदांतला संगणकीय क्षेत्रात रुची आहे,तसेच त्याने या रुचीला साजेशी अशी कामगिरी ही करून दाखवली. यंदाच्या झालेल्या जेईई मेन्समध्ये त्याची परसेंटाईल 99.69 इतकी होती. जेईई मेन्सला वेदांतला संपूर्ण भारतात 56 वी आणि ऍडव्हान्सला संपूर्ण भारतात 142 वी रँक मिळाली. तसेच त्याची IIT हैद्राबाद येथे संगणक शाखेत उच्चशिक्षणासाठी निवड ही झाली.

    मेहनती स्वभावाच्या वेदांतकडून त्याच्या वडिलांनी तशी मेहनत करूनही घेतली. आईचे सहकार्य आणि वडिलांचं मागर्दशन, याच्या जोरावर वेदांतने हा पल्ला गाठला. वेदांतच्या या यशात SGU मधील त्यांचे मुख्याध्यापक गुप्ता सर आणि विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा