जयसिंगपूर पोलिस ठाणे आणि आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवा भावी संस्था संचलित आई वृध्दाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर क्रांती चौकात मोफत अन्नदान छत्र सुरू केले आहे.
जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांच्या कल्पनेतून आणि सहकार्यातून जयसिंगपुरातील अनाथ , निराधार , मनोरूग , गोरगरीब , आणि फिरस्ते लोकांना किमान एक वेळचे तरी पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने मोफत अन्नदान छत्र सुरू केले आहे.
या अन्नदान छत्राचे उद्घाटन जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी सागर सेल्स ॲड सर्व्हिसेस चे मालक जीना पाटील , बालरोग तज्ज्ञ डॉ. रियाज अत्तार , सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे , राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. गंगाराम सातपुते यांनी श्रीफळ वाढविले. आणि या सर्वांच्याच हस्ते अन्नदान करण्यात आले. यावेळी युवा आघाडीचे राज्याध्यक्ष राहुल पोवार , हिरकणी न्युज चे संपादक गणेश वाईकर , मल्लिकार्जुन व्यकंची , विनायक कोरे , सचिन माने , राजन सामंत शशिकांत घाटगे , कैलास काळे , उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा