Breaking

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार श्री . जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून शिरोळ तालुक्यातील श्री विद्यासागर हायस्कूल, अकिवाट या विद्यालयास अत्याधुनिक प्रिंटर प्रदान करण्यात आला.



         पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार आदरणीय श्री . जयंतजी आसगावकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून शिरोळ तालुक्यातील श्री विद्यासागर हायस्कूल, अकिवाट . या उपक्रमशील व शैक्षणिक गुणवत्तेमध्ये तालुक्यात अग्रेसर असणाऱ्या विद्यालयास ब्रदर कंपनीचा रुपये १८०००/- किंमतीचा अत्याधुनिक प्रिंटर प्रदान करण्यात आला. 

          विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.पी.ए. मगदूम सर यांनी कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सदर प्रिंटर स्विकारला .

          यावेळी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा . मुख्याध्यापकांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती मा. आमदार श्री.जयंतजी आसगावकर साहेब यांनी घेतली व समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिरोळ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा. श्री. दीपक कामत साहेब व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

            सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यलयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेणारे कुशल प्रशासक श्री. पी. ए. मगदूम सरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विविध योजना व शिक्षणपूरक साधनांची उपलब्धता विद्यालयात होत आहे . त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

         आदरणीय आमदार श्री. जयंतजी आसगावकर साहेब यांचे विद्यासागर संकुलातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा