संग्रहित |
दरवर्षी आजच्या दिवशी शिवसेनेचा खास दसरा मेळावा भरतो. कोरोनानंतर पहिल्यांदा हा सोहळा पार पडला. यावेळी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी "मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं," असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला टोला लगावत विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री आहे असं मला वाटतच नाही, आणि मी मुख्यमंत्री आहे असं कोणालाही वाटू नये. मी तुमच्या घरातील एक सदस्य आहे", असे ठाकरे म्हणाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे काही नेते ओरडत असतात. मात्र, त्यांच्या डोक्यात सत्तेचा अहंकार गेला आहे. ज्या क्षणी आमच्या डोक्यात अहंकार जाईल, त्या वेळी सगळं संपेल, असं ठाकरे म्हणाले.
माझा वाडा चीरेबंद आहे. तुमची डोकी फुटतील, पण तडा जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
Photo source - sakal
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा