ल.क.अकिवाटे औद्योगिक वसाहत येथील श्रीम इलेक्ट्रिक लिमिटेड मधील '२८ स्थानिक कामगारांना' अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य चिटणीस रुपेशजी ओवळकर,जिल्ह्याचे नेते पुंडलिक भाऊ जाधव, कामगार जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांच्या उपस्थितीत व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला. पण व्यवस्थापकाकडून कोणतीच सहकार्याची भूमिका आली नसल्याने उद्यापासून सर्व युनिटमध्ये काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी 'महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना,श्रीम इलेक्ट्रिक लिमिटेड,जयसिंगपूर युनिटच्या नामफलकाचे उद्घाटन' देखील करण्यात आले.
मनसे कामगार सेना, श्रीम,जयसिंगपूर चे अनावरण |
या वेळी जयसिंगपूर क्रांती चौकातून ल.क.अकिवाटे औद्योगिक वसाहत पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सिंधुताई शिंदे,तालुकाध्यक्षा सुनिताताई मोहिते- पडियार,शकुंतला कांबळे,उपाध्यक्षा वैशाली पाटील,नजीरा शेख,सुरेखा कोळी,वाहतूक सेना जिल्हा संघटना संजय भंडारे,शहराध्यक्ष लखन भिसे,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,तालुका सचिव श्रीकांत सुतार,वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राज इंडिकर,शहराध्यक्ष किरण चव्हाण,उपाध्यक्ष अमित पाटील,सचिन चाकोते कामगार युनियनचे अरुण जानकर,गोपाल बामणे,रणजीत जाधव,विशाल ठोमके, आसिफ शेख,सुभाष कांबळे,अनिल पारेख आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा