Breaking

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

*जयसिंगपूर M.S.E.B. कडुन आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी १००० सिमेंट विटांची मदत*

 

MSEB कर्मचाऱ्यांकडून वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी वीट देताना


प्रा.मेहबूब मुजावर : जैनापुर प्रतिनिधी


       महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ( MSEB ) जयसिंगपूर विभागा मार्फत आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी १००० ( एक हजार ) सिमेंट विटांची मदत करण्यात आली.ही ही मदत खरोखरच वृद्धाश्रमाच्या विकासात्मक सर्वांगीण बांधणीमध्ये मोलाची भर टाकणारी आहे.

जयसिंगपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे


          खरं म्हणजे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत जयसिंगपूर MSEB मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येकच वर्षी आई वृध्दाश्रमास अन्नधान्य तसेच गरजेच्या साहित्यांची मदत करून गणेशोत्सव साजरा केला जातो. पण यंदा आई वृध्दाश्रमाचे बांधकाम सुरू असल्याने जयसिंगपूर MSEB ला आई वृध्दाश्रमाने विटा देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन जयसिंगपूर MSEB ने आई वृध्दाश्रमास १००० विटांची मदत केली.

        यावेळी जयसिंगपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे यांनी प्रत्येकच गणेशोत्सवात एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील उपेक्षित घटकांना जयसिंगपूर MSEB  मार्फत आम्ही मदत करत असतो. पण मुलांनी टाकुन दिलेल्या आई वडिलांचा सांभाळ आई वृध्दाश्रमाचे अध्यक्ष संजय भोसले हे मुलांप्रमाणेच करत आहेत. हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आई वृध्दाश्रमाच्या पाठीशी जयसिंगपूर MSEB कायमस्वरूपी ठामपणे उभे राहणार असुन येथुन पुढेही अशीच मदत करत राहु असे आश्वासन दिले. आणि आई वृध्दाश्रमाच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश आवळे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले.

        यावेळी जयसिंगपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे , सहायक अभियंता - राम सावंत , बाबासाहेब सोलगे , कनिष्ठ अभियंता - रोहित सेवेकरी , अनिल गांडुळे , वरिष्ठ तंत्रज्ञ - उमेश आवळे , विजय गायकवाड ,सोमा माने , नाना अहिरे , अल्ताफ लाडखान , नवनाथ देवकर , सचिन माने , नितीन शिंगे , शुभम गायकवाड , सुनिल चाबरे , प्रथमेश जगदाळे इत्यादी MSEB चे कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा