मुडशिंगी, हातकणंगले; येथे राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथील वैद्यकीय अधिकारी यांनी नेत्र तपासणी केली. तसेच दिपाली आॕप्टीशियन इचलकरंजी यांच्या वतीने नेत्र तपासणी करुन गरजु रुग्णांना अल्प दरात चष्मे उपलब्ध करुन दिले. या शिबिरात ७८ ग्रामस्थांनी डोळे तपासून घेतले. पात्र रुग्णाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथे अल्प दरात करण्यात आल्या. या शिबिर प्रसंगी मुडशिंगीचे प्रभारी सरपंच श्री. गजाननराव जाधव, महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे, डॉ. अशोक पाटील , रो. यतिराज भंडारी , रो.राजू तारदाळे, रो.कमल किशोर राठी, रो. ताराचंद तोष्णिवाल, रो.कुमार कस्तुरे , रो. श्रीकांत राठी रो. अभिजित पाटील श्री. प्रमोद गुरव उपस्थित होते.
या शिबिर आयोजनामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा