संग्रहित छायाचित्र |
कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा हा एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा कोल्हापूरकरांना लाभला आहे व कोल्हापूरकरांनी तो जपला आहे. दरवर्षी दसरा चौकात हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी तो दरवर्षीप्रमाणे साजरा न होता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत जुना राजवाडा येथे पार पडला होता. यंदा मात्र हा ऐतिहासिक सोहळा परंपरेनुसार दसरा चौकात साजरा होणार आहे, मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोहळ्यासाठी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे, व त्यासाठी दसरा संयोजन समितीतर्फे खास पासची सोय केली आहे. ज्यांच्याकडे पास असतील त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. गर्दी टाळण्यासाठी दसरा चौकाकडे येणारे चारही मार्ग बॅरिकेडस् लावून बंद केले जाणार असून वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह व स्थानिक वाहिनीवरून होणार आहे. सोहळा अनुभवता येण्यासाठी शहरात दहा ठिकाणी स्क्रिन लावण्यात येणार आहेत.
संग्रहित छायाचित्र |
परंपरेप्रमाणे सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी दसरा चौकात शमीपूजन होईल. तत्पूर्वी श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई आणि गुरुमहाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकात येतील. छत्रपती परिवाराचे येथे आगमन झाल्यानंतर शमीपूजन होऊन सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा होईल. दसरा चौकात सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
गर्दी न करण्याचे आवाहन - पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे
Photo source - Maharashtra_times & dainikprabhat
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा