Breaking

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

कोल्हापुरात अंधश्रध्देला उधाण - ७ वर्षीय मुलाचा नरबळी

संग्रहित

 कोल्हापूर : कोल्हापुरात येथे पुन्हा एकदा हादरवून सोडणारी अंधश्रध्देची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील एका सात वर्षीय मुलाचा नरबळी दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनं सपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

      नरबळी चा बळी ठरलेला ७ वर्षीय आरव केशव केशरे याचे दोन दिवस आधी अपहरण झाले होते. त्याची शोधाशोध चालू होती, परंतु २ दिवसानंतर पहाटे घराशेजारी त्याचा मृतदेह आढळून आला. आरवचा मृत्यू हा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले तसेच मृतदेहावर हळद कुंकू आढळून आले त्यावरून हा नरबळी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत, ही हत्या गावातीलच कोणीतरी केला असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा