Breaking

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम पूर्वपदावर. हे कारण...

 

संग्रहित

काल काल रात्री साडेनऊ नंतर फेसबूक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया च्या वापरकर्त्यांना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंदला सामोरे जावे लागले आहे. रात्री बंद पडलेल्या सेवा सकाळी सुरू झाल्या होत्या परंतु काही वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. मात्र आता सर्व सेवा सुरळीत झाल्या आहेत.


काय होते कारण ?

व्हाट्सअप इंस्टाग्राम तसेच फेसबुक या सर्व सोशल मीडिया कंपनी ची मूळ मालक असलेली कंपनी द फेसबुक चा सर्वर काल अचानक तांत्रिक कारणामुळे बिघडला. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या मंडळींना काल मेसेज पाठवता आणि मेसेज घेता येत नव्हते. मुख्य कारण कंपनीने अद्याप स्पष्ट केले नसले तरी तज्ञांच्या मते हा एक सायबर हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

        पण यामध्ये या तिन्ही कंपन्या चा तोटा तर झालाच पण अनेक ऑनलाईन व्यवहार उद्योग यांनादेखील कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला आहे.

# जगाची अर्थ व्यवस्था प्रती तास 1192.9 कोटी नुकसानीत.

# फेसबुक मालक मार्क झुकरबर्ग ला 52190 कोटी चा फटका. फोर्ब्स नुसार झुकरबर्ग ची संपत्ती कमी झाली. श्रीमंताचे यादीमध्ये मार्क झुकरबर्ग ची सहाव्या स्थानी घसरण.

# फेसबुकचे 596 कोटी उत्पन्न बुडाले.

     वरील तिन्ही कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून तशी कंपनीने सर्व वापरकर्त्यांना कल्पना दिली व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

      या सर्व घटनेनंतर वापरकर्त्यांना प्रश्न पडला आहे की एकाच जसे की फेसबुक कंपनीवर किंवा त्यांच्या सुविधावर अवलंबून राहण्यापेक्षा इतर पर्यायांचा अवलंब करावा का?; आणि अशा प्रचंड वापर असणाऱ्या या कंपनीची सुरक्षितता आणि मिळणाऱ्या सेवेवर चौफेर टीका होत आहे.


जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा