Breaking

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

सणासुदीच्या तोंडावर पोलिसांनी एका आतंकवाद्यास शस्त्रास्त्रासह केली अटक. सणासुदीत हल्ला करण्याचा होता मनसुबा.


       दिल्ली पोलिसांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली येथील लक्ष्मीनगर मधून अटक केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून तो राजधानी दिल्लीत रहात होता.तो भारतातील प्रमुख स्लीपर सेल हेड असल्याचे बोलले जात आहे.

 

Photo source - ANI

नवी दिल्लीः दसरा - दिवाळीच्या तोंडावर एका आतंकवादी ला दिल्ली पोलिसांनी अटक करत पाकिस्तानी कुरघोडीचा डाव उधळून लावला आहे. दिल्लीतील लक्ष्मी नगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आज अटक करण्यात आली आहे. धक्कादायक माहिती अशी की हा दहशतवादी गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीत राहत होता आणि तो सतत त्याच्या पाकिस्तानी दहशतवादी म्होरक्याच्यां संपर्कात होता. अटक केलेल्या या दहशतवाद्याचे नाव अशरफ उर्फ नूरी आहे. तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूत्रधारांना माहिती पाठवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता याच्यासोबत अजुन किती साथीदार आहेत, व यांचं काय लक्ष होत याची चौकशी सुरू आहे.



       हे दहशतवादी एक मोठी हानिकारक घटना घडवण्याच्या तयारीत होते. या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून AK-47 रायफलसह अतिरिक्त मॅग्झिन, ६० जिवंत काडतुसं, एक हातबॉम्ब, ५० जिवंत काडतुसं आणि २ अत्याधुनिक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा